बालविवाहाची समस्या थांबवण्यास सर्वसमावेशक कायदा व्यवस्था,प्रबळ इच्छाशक्ती,लोकसहभागाची विशेष गरज आहे – न्यायाधीश श्रीमती एस.ए. साळुंखे
बालविवाह रोखण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण – न्यायाधीश श्रीमती एस.ए.साळुंखे पंढरपूर दि. 04:- बालविवाहाची समस्या थांबवण्यासाठी सर्वसमावेशक कायदा व्यवस्था आणि प्रबळ इच्छाशक्ती तसेच लोकसहभागाची विशेष गरज आहे. जर बालविवाह झाला तर बालविवाहासाठी दोषी ठरलेल्या सर्व व्यक्तींना दंड, किंवा शिक्षा होऊ शकतात. या कायद्यात मुलांसाठी विवाहाचे किमान वय 21 वर्षे आणि मुलींचे 18 वर्षे निश्चित करण्यात…
