varun gandhi : वरुण गांधी भाजपला रामराम करणार? सोशल मीडियावर फोटो व्हायरल


नवी दिल्लीः भाजपने जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना स्थान देण्यात आलेलं नाही. यावरून आता तर्कवितर्क लावले ( varun gandhi photo viral on social media ) जात आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये त्यांच्या ‘स्वागता’चे पोस्टर लावले आहेत. प्रयागराजमध्ये काँग्रेस नेत्यांनी काही पोस्टर्स बनवून ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत.

‘दुःख भरे दिन बीते रे भइया अब सुख आयो रे’ असं वरुण गांधींच्या स्वागताच्या पोस्टरवर लिहिले आहे. त्यात वरुण गांधींसोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा फोटो आहे. त्याखाली इर्शाद उल्ला आणि बाबा अभय अवस्थी यांचे फोटो आहेत. हे दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते असल्याचं त्यात सांगण्यात आलं आहे.

वरुण गांधी भाजपला रामराम करणार?

वरुण गांधींची बंडखोरी पाहता ते भाजपला रामराम करणार करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या ट्विटर प्रोफाईलचा स्क्रीनशॉट देखील व्हायरल झाला होता. यात त्यांनी ट्विटर बायोमधून भाजप हटवले होते. पण वरुण गांधींच्या जवळच्या मित्रांनी हे तर्क फेटाळून लावले आहेत. वरुण गांधींनी कधीच बायोमध्ये पक्षाचे नाव लिहिले नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

amit khare appointed as advisor to pm : PM मोदींच्या सल्लागारपदी अमित खरेंची नियुक्ती, कोण आहेत खरे? वाचा…

वरुणने लखीमपूर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले

लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेवरून वरुण गांधींनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे. वरुण गांधींची नाराजी लखीमपूर खिरी हिंसाचारापूर्वीही दिसून आली होती. वरुण गांधींनी ऊसाला ४०० रुपये दर जाहीर करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री योगींना पत्रही लिहिले होते. तसंच ५ सप्टेंबरला मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या महापंचायतीमध्ये वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन सरकारची गोची केली होती.

coal shortage : कोळसा मंत्र्यांनी दिले उत्तर; म्हणाले, ‘…. पण राज्यांनी तसं केलं नाही’

वरुणच्या नाराजीचे कारण काय?

वरुण गांधी आणि आई मनेका गांधी यांच्याकडे पक्षाकडून सतत दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे ते पक्षाच्या भूमिके पलिकडे जाऊन वक्तव्य करत आहेत. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावेळी वरुण गांधी यांच्या नावाचीही चर्चा होती. पण त्यांचा समावेश झाला नाही. याशिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या यूपी निवडणुकीत वरुण गांधींना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली नाही, यामुळे वरुण गांधी नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: