Diwali Celebrations: पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत देशातील नेत्यांकडून जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा!


नवी दिल्ली : देशभरात आज दिवाळी साजरी होतेय. एकीकडे बाजारात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येतेय तर दुसरीकडे करोना संक्रमण फैलावण्याची चिंताही प्रशासनाला सतावतेय.

दीपावली निमित्तानं देशभरातील नेत्यांकडून जनतेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. सोशल मीडियाच्या दमदार प्रभावामुळे बहुतांश नेत्यांनी जनतेला शुभेच्छा देण्यासाठी याच मार्गाचा अवलंब केलेला दिसतोय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिवाळीच्या निमित्तानं देशवासियांच्या सुखाची – संपन्नतेची कामना केलीय. ‘दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो अशी आशा’ यानिमित्तानं पंतप्रधानांनी व्यक्त केलीय.

pm modi diwali with jawans : PM मोदी यंदा राजौरीमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार
Uttarakhand: केदारनाथ पुरोहितांकडून मोदी दौऱ्याचा विरोध, मुख्यमंत्री धामींकडून मनधरणी

याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेच्या जीवनात हा सण नवी ऊर्जा, प्रकाश, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय.

देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळच्या वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनीही दिवाळीच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दिव्याचा उजेड कोणत्याही भेदभावाविना सगळ्यांना प्रकाश देतो – हाच दीपावलीचा संदेश आहे. आपल्या माणसांसोबत दिवाळी असो, सगळ्यांची हृदय जोडणारी दिवाळी असो’, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर बी डी मिश्रा आणि मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा आग्रह केला.

‘महाराष्ट्र टाईम्स’कडूनही सर्व नागरिकांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि आनंदी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

petrol and diesel excise duty : भाजपशासित राज्यांचा मोठा निर्णय; केंद्रानंतर ६ राज्यांची इंधनावरील व्हॅटमध्ये कपात
excise duty on petrol and diesel : इंधनावरील उत्पादन शुल्कात केंद्राने केली कपात; आता राज्य सरकारे व्हॅट कमी करणार का?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: