Tulsi Plant Vastu घरात तुळशीचे रोप लावतांना या गोष्टी लक्षात ठेवा

[ad_1]


Tulsi Plant Vastu हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पूजनीय मानले जाते. हे रोप भगवान विष्णुंना अत्यंत प्रिय आहे. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीची नित्यनियमाने पूजा केली जाते तिथे सुख समृद्धि टिकून राहते. वास्तु मध्ये तुळशीचे रोप अत्यंत महत्वपूर्ण मानले गेले आहे तुळशीचे रोप नकरात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक उर्जेला चालना देते तुळशीला सौभाग्याचे प्रतीक मानले आहे. पण जर घरात हे व्यवस्थित दिशेला ठेवले गेले नाही तर याचे शुभ परिणाम मिळत नाही तुळशीच्या रोपाला कधीच दक्षिण दिशेला ठेऊ नये. कारण ही दिशा पित्रांची आणि यमराजची मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला ठेवण्यासाठी उत्तर-पूर्व दिशा योग्य मानली जाते. 

 

तुळशीच्या रोपाला नेहमी आशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्यप्रकाश येत असेल. जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीच्या रोपाला अंधारात ठेवले असेल किंवा तिथे सूर्यप्रकाश पोहचत नसेल तर हे चांगले मानले जात नाही. काही लोक घराच्या जमिनीतच तुळशीचे रोप लावुन देतात. असे करू नये तुळशीच्या रोपाला कधीच जमिनीत लावू नये तुळशीचे रोप नेहमी कुंडित लावणे शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ नेहमी साफसफाई ठेवावी याच्या जवळ बूट-चप्पल, खराब कपडे , झाड़ू इतर गोष्टी ठेऊ नये तसेच तुळशीच्या रोपाला नेहमी स्वच्छ हात लावावा.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top