अहमदनगर रुग्णालय आग: व्हेंटिलेटरच्या मुद्द्याला पालकमंत्री मुश्रीफ यांचे समर्थन


हायलाइट्स:

  • निष्कृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन रुग्णालयात आग लागली- आमदार रोहित पवार यांचा आरोप.
  • या आरोपासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करणार- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा.
  • पालकमंत्री मुश्रीफ यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची रात्री पाहणी केली.

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला पंतप्रधान निधीतून मिळालेल्या निष्कृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन आग लागल्याचा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. या सर्व मुद्द्यांनुसार संपूर्ण दुर्घटनेची सखोल चौकशी करणार आणि दोषींवर कारवाई करणार असल्याची घोषणा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली. (Guardian Minister Hasan Mushrif supports ventilator issue in Ahmednagar hospital fire case)

पालकमंत्री मुश्रीफ यांनी तातडीने अहमदनगरला येत जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची रात्री पाहणी केली. आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, महापौर गणेश भोसले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पाण्डेय, पोलिस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- मुंबई: कांदिवलीत १५ मजली इमारतीत भीषण आग, दोन रहिवासी जखमी

पालकमंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संपूर्ण घटनेची चौकशी होणार, या वाक्यावर जोर दिला होता. या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर निश्चित कारवाई करू, असे यावेळी मुश्रीफ यांनी सांगितले. हिंदीमध्ये संवाद करत “किसी को भी नही बक्ष गें”, असा डायलॉग पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी मारला.

क्लिक करा आणि वाचा- ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक उद्या करणार नवा धमाका; म्हणाले, ‘सत्य सर्वांसमोर आणणार’

विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पाण्डेय यांनी याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती दिली. विभागीय आयुक्त यांच्या चौकशीनंतर आरोपींची नावे निश्चित होतील, असेही त्यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- ‘आर्यन खानला १०० टक्के अडकवले गेले आहे’; साक्षीदार विजय पगारेंचा खळबळजनक दावा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: