farmers stop screening of sooryavanshi : शेतकऱ्यांचा आता अक्षय कुमारला विरोध; ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखले
बर्नाला येथे भारतीय किसान युनियन (कादियां) चे जिल्हाध्यक्ष स्वरण धुग्गा यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात स्थानिक शहीद उधम सिंग पार्क ते स्वर्ण सिनेमा असा निषेध मोर्चा काढला. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ न बोलल्याबद्दल अभिनेता अक्षय कुमारचा निषेध केला.
केंद्राचे नवीन कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत अक्षय कुमारचे चित्रपट दाखवू देणार नाही, भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारे शेकडो शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत.
Haryana: शेतकरी आंदोलकांना म्हटलं ‘बेरोजगार दारुडे’, भाजप खासदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या