शेतकरी बचत गट लाभांश म्हणून सोन वाटप करतो हे आज खरं वाटणारे नाही पण.. – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

शेतकरी बचत गट लाभांश म्हणून सोन वाटप करतो हे आज खरं वाटणारे नाही पण.. – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

कंदर ,करमाळा : शेतकरी बचत गट लाभांश म्हणून सभासदांना प्रत्येकी एक तोळा वा अर्धा तोळा सोन वाटप करतो हे आज खरं वाटणारे नाही पण माझेच हस्ते वाटप होते आहे हे खूप प्रेरणा देणारे आहे , त्यांनी आता विकासासाठी प्रक्रिया उद्योगात लक्ष घालून नेतृत्व करावे व परिसरातील शेती व शेतकऱ्यांना सोनेरी भविष्य मिळवून द्यावे ,यासाठी सर्व ते सहकार्य करेन, असे प्रोत्साहित करणारे उद्गार सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कंदर येथे काढले. ते बचत गट लाभांश वाटप कार्यक्रमात बोलत होते.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह .भ.प. निंबाळकर महाराज तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषीरत्न आनंद कोठडीया हे होते .या कार्यक्रमास  जोडूनच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  बाळासाहेब शिंदे व मदन मुकणे ,प्रकल्प संचालक, आत्मा यांनी मार्गदर्शन केले .

दादासाहेब पाटील यांनी सेंद्रिय शेतीसंदर्भात अनुभव सांगताना शेतीचा खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही असे सांगितले  .

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयोजक गोपाळराव मंगवडे, किरण डोके व सहकारी यांनी प्रयत्न केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: