पंढरपूर शहरातील अवजड वाहतूक बाहेरून करा आणि सिग्नल व्यवस्था सुरू करा
पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीने शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले निवेदन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०१/२०२५- पंढरपूर शहराला बायपास रस्ता असतानाही अवजड वाहतूक शहरातून होत आहे त्याकडे डोळेझाक होताना दिसत आहे. तरी बायपास रस्त्याला दिशादर्शक फलक बसवून ती वाहतूक शहरामध्ये न येता बाहेरच्या बाहेर वळविण्यात यावी. सकाळी व दुपारच्या वेळेत शहरात येणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्यात यावी तसेच शहरातील गाड्यांची संख्या लक्षात घेता शहरातील अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होत आहे. तरी महत्वाच्या गर्दीच्या चौकात सिग्नल बसवून ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत तातडीने सिग्नल व्यवस्था चालू न झाल्यास व शहरातून होणारी जड वाहतूक सकाळी व दुपारच्या वेळेस बंद न केल्यास या विरोधात आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.सदरचे निवेदन पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले आहे.
या निवेदनाची प्रत सोलापूर लोकसभेच्या कॉंग्रेसच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना पाठविण्यात आली आहे.हे निवेदन शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना देण्यात आले त्यावेळी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष संदिप शिंदे,सेवा दल शहराध्यक्ष गणेश माने, सोलापूर जिल्हा सरचिटणीस पांडुरंग डांगे, सोशल मिडीया शहराध्यक्ष महेश अधटराव, शहर उपाध्यक्ष नागनाथ अधटराव, मिलिंद अढवळकर,भिमाशंकर इंगोले,संग्राम मुळे, चिटणीस सुहास गायकवाड,एकनाथ माने, सुदिप पवार आदि कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

