महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

मुंबई, दि.1 मे /ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 08.00 वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवनाची वास्तू पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळून निघाली होती. ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधान क्षपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे तसेच महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सह सचिव श्रीमती मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, उप सचिव राजेश तारवी,उमेश शिंदे,उप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, अवर सचिव विजय कोमटवार, संचालक,वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मानवंदना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *