नागरिकांसाठी पालघर पोलीस दलाची अधिकृत वेबसाईट कार्यान्वीत
पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज- पोलीस दलासंदर्भात घडणाऱ्या दैनंदिन घडामोडींची माहिती प्रसारीत करण्यासाठी तसेच पोलीस दलासंदर्भात अशी प्रसारीत केलेली माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी व नागरिकांना ऑनलाईन तक्रार करता यावी या अनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस दलाकडून अधिकृत वेबसाईट https://palgharpolice.gov.in/ ही कार्यान्वीत केलेली आहे.
सदर वेबसाईटमध्ये पोलीस दलाविषयी दैनंदिन घडणाऱ्या घडामोडीची प्रसिद्धी पत्रक (प्रेसनोट),भाडेकरु माहिती,नागरीक अलर्ट वॉल,चांगली कामगिरी,महिला व बालकांसाठी हेल्पलाईन नंबर, डायल ११२ हेल्पलाईन नंबर, सर्व पोलीस ठाणे मेल आयडी व मोबाईल क्रमांक, सर्व पोलीस ठाणे माहिती, ताज्या बातम्या, वरिष्ठ अधिकारी माहिती, संपर्कात राहण्यासाठी पालघर पोलीस दलाचे फेसबुक व ट्विटर पेज, सायबर सुरक्षा टिप्स,विशेष पथक,नागरिकांसाठी इतर महत्वाच्या वेबसाईट, माहिती अधिकार कायद्यानुसार उपलब्ध करुन देण्यात येणारी माहिती,आंतरजातीय/आंतरधर्मीय जोडप्यांना सुरक्षा पुरविण्या साठी कक्ष,अंमली पदार्थ विरोधी कक्ष, दहशतवाद विरोधी कक्ष,ऑनलाईन तक्रार नोंद करण्यासाठी सुविधा,पोलीस भरती संदर्भात जाहिरात व निकाल, सायबर गुन्हे घडू नयेत यासाठीची माहिती,सामुहीक हिंसा संदर्भात,प्रथम खबरी अहवालाविषयी माहिती अशा प्रकारची माहिती दररोज अद्ययावत करण्यात येते.
तसेच पालघर पोलीस दलाचे अधिकृत ट्विटर, फेसबुक व इंस्टाग्राम हे पेज देखील नागरिकांसाठी उपलब्ध असून त्याची लिंक खालीलप्रमाणे आहेत.
१. ट्विटर अकाउंट लिंक:
https://x.com/Palghar Police?t=nbpAEnrVvePXPdxMuX BUA&s=08 २. फेसबुक पेज लिंक :
https://www.facebook.com/Palghar District Police?mibextid=ZbWKwL
३. इंस्टाग्राम पेज लिंक :
https://www.instagram.com/palghar.police?igsh=bXhkYzkxeGgwMzl2
पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.आजपर्यंत पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वेबसाईटला एकूण ५,८९,६२८ नागरिकांनी भेट दिलेली आहे. तरी सर्व नागरिकांना पालघर जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते कि, पालघर पोलीस दलाची अधिकृत वेबसाईट https://palgharpolice.gov.in/ चा तसेच वर दिलेले ट्विटर, फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देवून संपर्कात रहावे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.