शहरातील नागरिक व मतदारांच्या सोयी करिता दि.7-5-2024 रोजी रेल्वे रुळाच्यावरील व रेल्वे रुळाच्या खालील भागात पाणीपुरवठा होणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीमुळे उद्या होणार पाणी पुरवठा

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6-5-2024 – अपुऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी कमी झाल्याने पंढरपूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुक होत असल्याने शहरातील नागरिक व मतदार यांच्या सोयी करिता दि.7-5-2024 रोजी रेल्वे रुळाच्या वरील व रेल्वे रुळाच्या खालील भागात पाणीपुरवठा होईल.

दि.8-5-2024 रोजी पुर्वे प्रमाणे एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल,याची नागरिकांनी नोंद घ्यावी व पंढरपूर नगर परिषेदस सहकार्य करावे अशी विनंती पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी पंढरपूर मधील सर्व नागरिकांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *