योगशिक्षक महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अशोक ननवरे फेरनियुक्त

योगशिक्षक महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अशोक ननवरे फेरनियुक्त

पंढरपुर / ज्ञानप्रवाह न्यूज- योगा फाऊंडेशन संचलित महाराष्ट्र योगा शिक्षक महासंघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी योगाचार्य अशोक ननवरे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

योगाचार्य अशोक ननवरे हे सातत्याने सन १९९० पासून योगप्रचार-प्रसार व योगा शिक्षणात कार्यरत आहेत.योग विद्या गुरुकुल नाशिक या विद्यापीठाने त्यांना योगाचार्य पदवी देऊन सन्मानित केलेले आहे. त्यांनी मानसशास्त्रात बी.ए. केले असून योग शाखेत एम‌.ए. पूर्ण केले असून आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त योगशास्त्रात पदविका व पदवी चे शिक्षण पूर्ण करून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या योगशिक्षक पदविका अभ्यास – केंद्राचे पंढरपूर येथील योग महविद्यालयाचे ते प्राचार्य म्हणून काम पहातात.

त्यांनी सोलापुर जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त शासनमान्य योगशिक्षक घडविले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद सोलापूर मध्ये आरोग्य अभियानांतर्गत शंभरहून अधिक योगशिक्षकांना रोजगाराची संधी मिळाली आहे.

त्यांचे हे भरीव कार्य पाहून योगाशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉ मनोज निलप‌वार यांनी त्यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी फेरनियुक्ती केली आहे. विभागीय अध्यक्ष प्रा.सदानंद वाली व योग विद्या धाम परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *