हिरे त पहिल्यांदाच एकाच दिवशी 25 रुग्णांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया– जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेटून केले अभिनंदन
शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकातील डॉक्टरांचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेटून केले अभिनंदन
रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून केले चष्मांचे वाटप

धुळे,दि.8 फेब्रुवारी 2025,जिमाका वृत्तसेवा- शहरातील डॉ.भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 25 रुग्णांवर तर आज 10 रुग्णांवर असे एकूण 35 नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका दिवसात इतक्या शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज हिरे महाविद्यालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
राज्य शासनाने शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानूसार शुक्रवारी हिरे रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया झाल्या. त्यासाठी सकाळपासून आवश्यक तयारी करण्यात आली होती. ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार होत्या त्यांना एक दिवस आधीच रुग्णालयात दाखल केले होते. फिटनेस चाचणी झाल्यावर सकाळी आठ ते दुपारी दीड या वेळेत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रूग्णालयात भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व स्टाफचे अभिनंदन केले. तसेच या सर्व 35 रूग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांची डोळ्यावरील पट्टी काढून त्यांना चष्मांचे वाटप केले.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, हिरे रुग्णालयाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून असे उपक्रम एक दिवसापुरते मर्यादित न राहता नियमित राबविण्यात यावे.

सर्वांच्या प्रयत्नाने शक्य-डॉ.मुकर्रम खान
हिरे रुग्णालयात अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे.सर्व रुग्णांची सोय होईल असा प्रशस्त वॉर्ड आहे. त्यामुळे एका दिवसात इतक्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याचे नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. मुकर्रम खान यांनी सांगितले.
हिरे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सयाजी भामरे,अधीक्षक डॉ.अजित पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मुकर्रम खान, डॉ.मुकेश सैनी यांनी शस्त्रक्रिया केल्या.त्यांना डॉ. अंकिता पटेल, डॉ.निकिता वसावे,डॉ.अमोल घुले, डाॅ विनोद धुत, डाॅ.निकिता इंगोले, डाॅ आदिती कासट, डाॅ माया वसईकर, डाॅ अनिल रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ दत्ता देगावकर, स्टाप नम्रता वळवी, रूखसाना शेख, साधना वळवी, निलेश वाडेकर व रुग्णालयातील सर्वांचे सहकार्य लाभले.
रुग्णांचे केले समुपदेशन
या शस्त्रक्रिया झालेले सर्व रुग्ण हे वयोवृद्ध आहे. त्यापैकी अनेकांना रक्तदाब, मधुमेह व इतर व्याधी होत्या. मुंबई, नाशिक येथील खासगी रुग्णालयाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. शस्त्रक्रियेपूर्वी सर्वांचे डॉक्टरांनी समुपदेशन केले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.