BOND पंढरपूर ब्राह्मण संघटनेच्यावतीने समाजरत्न व बॉण्ड उद्योजक पुरस्कार

BOND पंढरपूर ब्राह्मण संघटनेच्यावतीने समाजरत्न व बॉण्ड उद्योजक पुरस्कार

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर अर्बन बँक सभागृह खवा बाजार येथे BOND पंढरपूर ब्राह्मण संघटनेच्या वर्धापनदिना निमित्त पुरस्कार वितरण सोहळा बॉण्डचे संस्थापक जितेंद्र कुलकर्णी व संस्थापिका सौ.उत्कर्षा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सम्पन्न होणार आहे.

ब्राह्मण समाजाप्रती आपण करत असलेल्या कार्याची दखल घेऊन BOND ब्राह्मण संघटन परिवाराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी आपणास BOND समाजरत्न व बॉण्ड उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे असे पत्र पुरस्कार्थींना देण्यात आले आहे.

BOND समाजरत्न पुरस्कार 2025

प.पू श्री मदन महाराज हरिदास,संदीपजी वांजपे,धनंजयजी मांडके,प्रशांत चौधरी यांना प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर बॉण्ड पंढरपूर संघटनेसाठी महत्वपूर्ण सहकार्य व पंढरपुरातील प्रथितयश उद्योजक -आनंद तेंडुलकर,नारायण बडवे,प्रसाद खाडिलकर, रमाकांत दुनाखे,हृषीकेश उत्पात, आदित्य जोशी, श्रीधर आंधळगावकर,पांडुरंग हरिदास, रामकृष्ण बिडकर,चिंतामणी दामोदरे यांना बॉण्ड उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त BOND परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Back To Top