पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,उ.मा.का.दि.19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने बुधवार दि.19 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी प्र.विजया पांगरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जुन भोसले,मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, तहसीलदार सचिन लंगुंटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर,प्रशासकीय अधिकारी रविंद्र सूर्यवंशी,नगर अभियंता नेताजी पवार,उप अभियंता प्रकाश केसकर,पाणी पुरवठा अभियंता राज काळे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे,नागनाथ तोडकर,खरेदी पर्यवेक्षक विजय शहाणे,कृष्णात जगताप,सुवर्णा हाके, करुणा शेळके,संभाजी देवकर,जयंत पवार, दर्शन वेळापूरे,चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.