येत्या 22 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन The postal court will be held on June 22

कोल्हापूर,दि.01/06/2021,(जिल्हा माहिती कार्यालय) – मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल (मुंबई) यांच्या कार्यालयामध्ये येत्या 22 जून रोजी 115 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक, (कोल्हापूर विभाग) यांनी दिली.

महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु, मनी ऑर्डर बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.

   संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार एम.शान्तला भट्ट, सहायक निर्देशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव,डाक अदालत,मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय,मुंबई जी.पी. ओ.इमारत, दुसरा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रतीसह दि.10 जूनपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची  दखल घेतली जाणार नाही. सदरचे प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेबसाईट www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *