प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते..चेअरमन कल्याण काळे

प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते..चेअरमन कल्याण काळे

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21- गुणवत्ता वाढीसोबत विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव देत स्वतः मध्ये बदल करणे अपेक्षीत आहे. प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन सहकार शिरेामणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांनी केले.

कु.पुर्वा सुरेश ढाणे रा.पंढरपूर या विद्यार्थीनीने JEE (B.Arch) आर्किटेक्चर या परिक्षेत 99.75% मार्कस घेवून ऑल इंडिया रँक 207 प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केलेबद्दल काळे परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सहकार शिरेामणीच्या संचालिका मालनबाई काळे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विलास काळे, सौ.जयश्री विलास काळे,सौ.संगिता कल्याण काळे,विक्रांत काळे,यशराज काळे,मयुरी काळे,समिक्षा काळे, ललिता पवार, अविनाश पवार, सुनिल फराडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थीनीचे पालक सुरेश ढाणे, सौ.मनिषा सुरेश ढाणे यांचेही अभिनंदन काळे परिवाराकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *