माझा फोकस फिक्स आहे मला कोण व्हायचंय आणि कुठं जायचंय ते – चेअरमन अभिजीत पाटील
घे भरारी मार्गदर्शन शिबिरत विठ्ठल कांगणे सरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/२०२४- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने पंढरपूर तालुक्यातील इयत्ता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी घे भरारी मार्गदर्शन शिबिर व्याख्याते विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान रूक्मिणी सभागृह पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते.
अतिशय सुंदर आणि गावरान भाषेमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला आपलं ध्येय गाठायचे आणि स्वतःची स्पर्धा स्वतः करायची अशा सोप्या भाषेमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते मार्गदर्शक विठ्ठल कांगणे सर यांनी उपस्थित हजारो विद्यार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सामाजिक व राजकीय जीवनात वाटचाल करताना अनेक अडचणी व चढ-उतार आयुष्यात येत असतात,परंतु या सर्व गोष्टींना न घाबरता पुढे जायचे असते. मी माझे ध्येय व लक्ष निश्चित केले आहे व मला कुठे जायचं आहे हे मी ठरवले आहे, असे मत विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.
अभिजीत पाटील यांनी नेहमी आपल्या कार्यातून समाजासाठी व जिल्ह्यातील सर्व सामाजिक घटकांना न्याय देण्यासाठी विविध सूक्त उपक्रम राबवत असतात. त्यांच्या पुढाकाराने आयोजित ‘घे भरारी मार्गदर्शन शिबिरामुळे’ विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे.
यावेळी डाॅ.बी.पी रोंगे, सुभाष माने सर,उत्तम कोकरे, पी.जे. सावंत सर, कालिदास कवडे सर, सिकंदर ढवळे सर, प्रमोद पाठक सर, रजनीताई जाधव मॅडम, ऊंडे मॅडम, कैलास करांडे सर, औदुंबर गायकवाड सर, जे.बी. गायकवाड सर, पिसे सर, प्रशांत पाटील सर, गणपत मोरे सर, व्ही.एम. कुलकर्णी सर, डी.वाय.पाटील सर, कोंडलकर सर, महादेव लवटे सर, व्ही एस शेळके सर, गाजरे सर मुख्याध्यापक कृषी विद्यालय शेळवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------