CDS बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानं भारतासहीत पाकिस्तान लष्करही हळहळलं!


हायलाइट्स:

  • भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचं निधन
  • रावत यांना हेलिकॉप्टर अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं
  • अपघातात CDS रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू

इस्लामाबाद, पाकिस्तान :

भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं आज तामिळनाडूत झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातानंतर मृत्यू झाला आहे. जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनं भारतच नाही तर पाकिस्तानातही हळहळ व्यक्त केली जातेय.

पाकिस्तानचे ‘जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी’ (CJCSC) प्रमुख जनरल नदीम रझा तसंच पाकिस्तानचे लष्करप्रमुख (COAS) जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारतीय संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तान सशस्त्र दलाचे प्रवक्त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आलीय.

CDS बिपीन रावत यांच्या निधनावर पाकिस्तान लष्कराची प्रतिक्रिया (सौ. ट्विटर)

Bipin Rawat Death Update: बिपीन रावत यांच्यासोबत ‘त्या’ हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होतं? नावं जाहीर
Mi-17V-5 हेलिकॉप्टर हवाई दलातील सर्वश्रेष्ठ; सर्जिकल स्ट्राइकमध्ये बजावली होती महत्त्वाची भूमिका
कसा घडला अपघात?

बिपीन रावत बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळाहून सुलूर इथं दाखल झाले होते. त्यानंतर एमआय १७ या हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने ते तामिळनाडूच्या वेलिंग्टनकडे निघाले होते. वेलिंग्टन इथल्या स्टाफ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार होते. यादरम्यान बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यादेखील त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये होत्या.

मात्र, ११.४८ वाजता सुलूरहून निघाल्यानंतर १२.२२ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरचा अचानक संपर्क तुटला आणि काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळल्याचं वृत्त समोर आलं. या दुर्घटनेत रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, सायंकाळी ६.०० वाजल्याच्या सुमारास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृतरित्या बिपीन रावत यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला.

तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ हा अपघात घडला. या अपघतात बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासहीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Sialkot lynching: ‘पाकिस्तान म्हणजे काही भारत नाही’, पाक मंत्र्यांनं नाहक भारतालाही वादात ओढलं
श्रीलंकन व्यक्तीची क्रूर हत्या : पाकिस्तान संरक्षणमंत्र्यांचं लाजिरवाणं वक्तव्यSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: