कुटुंबातील सदस्य एकच प्रश्न विचारत आहेत की ,मुलीचे हात पाठीमागे बांधलेले होते, मग तिने गळफास घेतलाच कसा ?
बलिया उत्तरप्रदेश- उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. तिचे हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत होते आणि मृतदेह दोरीच्या साहाय्याने झाडाला लटकलेला होता.
यूपी पोलिसांनी ५ दिवस या प्रकरणाचा तपास करण्याचे नाटक केले आणि अखेर भाजप सरकारच्या ‘प्रतिमा जतन करण्याच्या धोरणानुसार’ ही आत्महत्या असल्याचे घोषित करण्यात आले.
मुलीचे कुटुंबी रडत आहे आणि न्यायाची मागणी करत आहे. ते स्पष्टपणे आरोप करत आहेत की ही आत्महत्या नसून हत्या आहे.त्यांच्या मुलीची हत्या करून तिला झाडाला लटकवण्यात आले आहे.
कुटुंबातील सदस्य एकच प्रश्न विचारत आहेत की ,मुलीचे हात पाठीमागे बांधलेले होते, मग तिने गळफास घेतलाच कसा ? हा असा प्रश्न आहे ज्यांचे उत्तरे पोलिसांकडे नाही. पोलिसांचा फक्त हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांना हा हेतू उत्तर प्रदेशातील भाजप सरकारकडून मिळाला आहे, ज्यांची विचारसरणीच गुन्हेगारांना वाचवण्याची आहे. ही एकमेव घटना नाही; अशा घटना दररोज घडत आहेत, ज्या सरकार लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
पीडितेच्या कुटुंबाला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे.या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावे अशी राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने मागणी करण्यात आली आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.