आ.अभिजीत पाटील यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूर नगरपरिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेत

पंढरपूर नगर परिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेत

आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०३/२०२५- अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेले पंढरपूर नगरपरिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलचा शुभारंभ पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, रा.पा कटेकर, किरणराज घाडगे, विक्रम शिरसट,नागेश जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर,कर्मचारी उपस्थित होते.

१०० वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर नगरपालिकेचे हॉस्पिटल अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होते. आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत पंढरपूर शहरातील नागरिकांनी नगरपालिकेचे हाॅस्पिटल बंद असल्याच्या तक्रार केल्याने आमदार अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करून नगरपालिकेचे हाॅस्पिटल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले.

सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी हाॅस्पिटल सुरू झाल्याने पंढरपूर शहर व परिसरात आनंदाचे वातावरण झाले आहे. कारण यामुळे हजारो गरजू रुग्णांना माफक दरात आरोग्यसेवा मिळणार आहे.या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या आणि एक्स रे सोनोग्राफी सारख्या सुविधा माफक दरात का होईना उपलब्ध झाल्यातर ते रुग्ण आणि नातेवाईक यांना सोयीचे होणार आहे.अनेक रुग्ण हे पैशाअभावी तपासणींपासून वंचित राहतात.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading