करकंब पोलीस ठाणेकडील दुध भेसळ गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक
कृत्रीम दुध बनवून दुसर्यांच्या जिवाशी खेळणार्या नराधमांना अटक
करकंब पोलीस ठाणेकडील दुध भेसळ गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत केली अटक

करकंब/ज्ञानप्रवाह न्यूज- दि.२०/०२/२०२५ रोजी करकंब पोलीस ठाणे सहायक पोलीस निरिक्षक सागर कुंजीर यांना गोपनिय बातमीदारामार्फत मौजे भोसे ता.पंढरपूर गावचे हद्दीमध्ये भेसळयुक्त दुध तयार करून त्याची वाहतुक होत असल्याबाबत बातमी मिळाली होती. त्या अनुशंगाने अन्न व औषध प्रशासन यांचे मदतीने छापा कारवाई करून मुख्य आरोपी दत्तात्रय महादेव जाधव रा.भोसे ता.पंढरपुर याचे मालकीचे जागेतुन कृत्रीम दुध बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला होता. त्याप्रमाणे करकंब पोलीस ठाणे येथे गु.र.नं.५०/२०२५ भा. न्या.सं. २०२३ चे कलम १२३,२७४, २७५,३(५) सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम ३ (१) (a), ३ (१) (ZZ) (V), २६(१), २६(२) (१), २६(२) (V), २७ (१), चे उल्लघन करून शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात आरोपी सचिन अरुण फाळके, वय ३१ वर्षे, रा. पांढरेवाडी, ता.पंढरपूर यास अटक करण्यात आली होती व इतर मुख्य आरोपी दत्तात्रय महादेव जाधव, त्याची पत्नी सोनाली दत्तात्रय जाधव दोघे रा.भोसे ता.पंढरपूर तसेच अनिकेत बबन कोरके रा.सुगाव भोसे ता.पंढरपूर, पृथ्वीराज उर्फ सोन्या नवनाथ शिंदे रा.पांढरेवाडी ता.पंढरपूर हे फरार होते.गुन्ह्याचा पुढील तपास पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले हे करीत असताना तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने मुख्य आरोपी दत्तात्रय महादेव जाधव, त्याची पत्नी सोनाली दत्तात्रय जाधव हे दोघे खाटुबडी राजस्थान येथे असल्याची बातमी मिळाल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे सपोनि अशिष कांबळे व सोबत पोहेकॉ/प्रसाद आवटी, मपोहेका /मोनिका पवार, पोकों/शहाजी मंडले यांनी तेथे जावुन नमुद दोन्ही आरोपींना शोधुन अटक केली. तर सपोफौ शरद कदम, पोहेका/सुरज हेंबाडे यांनी अनिकेत बबन कोरके यास पुणे येथुन आणि पृथ्वीराज शिंदे यास अकलुज येथुन ताब्यात घेतले. नमुद कारवाई करीता सायबर विभागाचे पोकों/रतन जाधव यांनी तांत्रिक मदत केली.
सदर गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले पंढरपूर उप विभाग पंढरपूर व त्यांची टीम सपोनि सागर कुंजीर,पोसई हमीद शेख,निलेश गायकवाड,पोहेकों/बापुराव मोरे, अशोक भोसले, निलेश रोंगे, पोना/राहुल लोंढे,विनोद शिंदे,पोकों/सिताराम चव्हाण, स्वप्निल बागल आदी पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत. सध्या अटक आरोपी पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास चालु आहे.
कृत्रीम दुध बनवून दुसर्यांच्या जिवाशी खेळणार्या नराधमांना अटक केली असली तरी त्यांना कच्चा माल पुरवणार्याचा शोध घेवून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. माढा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेमध्ये या दुधभेसळी विरोधात आवाज उठवला होता.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.