अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून पाहणी

मानेवाडी ता.मंगळवेढा येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून पाहणी


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२९/०५/२०२४ –अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मानेवाडी ता.मंगळवेढा येथे घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची आज विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाहणी केली.

मंगळवेढा तालुक्यात अवकाळी पाऊस वादळीवाऱ्यामुळे फार मोठे नुकसान झाले असून घरांवरील पत्रेही वाऱ्यामुळे उडून गेलेले आहेत .आज माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन येथील नुकसानाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त बांधवांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानीचा आढावा घेतला.

या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त बांधवाना धीर देत, प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत करण्याच्या सूचना दिल्या. या नागरिकांना शासनामार्फत शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे असा विश्वास माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी दिला.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading