पराभव हा हुकूमशाहीचा, पराभव हा जातीयवाद करणाऱ्या भाजपचा झाला – खासदार प्रणिती शिंदे

पराभव हा हुकूमशाहीचा झाला,पराभव हा जातीयवाद करणाऱ्या भाजपचा झाला – खासदार प्रणिती शिंदे

चला पुन्हा कामाला लागू या असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी विजयानंतर केले

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०६/२०२४- लोकसभा २०२४ निवडणूक प्रचारासाठी सोलापुर मतदारसंघात भारतीय जनता पक्ष महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पासून अनेक स्टार प्रचारक महाविकास आघाडीच्या कॉंग्रेस उमेदवार असलेल्या माझ्या विरोधात प्रचारासाठी येऊन गेले.पण सोलापुर मतदारसंघातील जनतेने सर्वधर्म समभाव आणि काम करणाऱ्यांना मतदान केले.पराभव हा हुकूमशाहीचा झाला,पराभव हा जातीयवाद करणाऱ्या भाजपचा झाला आहे असे नूतन खासदार सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या मोठ्या विजयानंतर बोलताना प्रतिपादन केले.

प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ,पंढरपूर, मंगळवेढा,दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, शहर मध्य,शहर उत्तर मधील सर्व जनतेचे, आणि सहकार्य केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त करत त्यांनी चला पुन्हा कामाला लागू या असे आवाहनही कार्यकर्त्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *