आषाढी वारीतील आंदोलन न करण्याबाबत आमदार समाधान आवताडे यांचे आवाहन

धनगर समाजाच्या प्रश्नासंदर्भात सरकारशी यशस्वी मध्यस्थी करू


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


आषाढी वारीतील आंदोलन न करण्याबाबत आ समाधान आवताडे यांचे आवाहन

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०७/२०२४- आषाढी वारीतील मुख्यमंत्र्यांच्या ऐन महापूजेच्या वेळी धनगर समाजाच्यावतीने आगळेवेगळे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सदरच्या आंदोलनाने मोठ्या सोहळ्याला गालबोट लागू नये. याकरिता आपण धनगर समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने सरकारकडे यशस्वी मध्यस्थी करू असे आश्वासन पंढरपूरचे स्थानिक आ.समाधान आवताडे यांनी दिले आहे.
  
सकल धनगर समाजाच्या वतीने स्थानिक आमदार म्हणून आ.समाधान आवताडे यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आले होते. त्यावेळी धनगर समाजाला आस्वासन दिले आहे.याबाबत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचेपर्यंत आपल्या भावना पोहचवीत याबाबत योग्य तोडगा काढण्याबाबत सरकारला विनंती करणार असल्याचे सांगितले आहे.

धनगर समाजाचे वतीने आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणी महापुजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यावेळी धनगर समाज व्ही आय पी गेट समोर आपल्या शेळ्या मेंढयासह दाखल होऊन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. त्यामुळे असे कोणतेही कृत्य आपल्या समाजाकडून घडू नये, आपल्या मागण्याचा विचार सरकार नक्की करेल असेही आ.समाधान आवताडे यांनी धनगर समाजाला आश्वासित केले आहे.

यावेळी महेश येडगे, साधू देवकते ,द्रोणाचार्य हाके, प्रशांत घोडके ,मारुती हळनवर ,दादा लवटे, प्रा.सुभाष मस्के ,स्वप्निल येडगे, रणजीत कारंडे आदीसह धनगर समाज बांधव उपस्थित होते.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading