माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंढरपूर नगर परिषद व सुंदर पंढरपूर हरित पंढरपूर वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंढरपूर नगर परिषद व सुंदर पंढरपूर हरित पंढरपूर वृक्षप्रेमी ग्रुपच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

वृक्षारोपण कार्यक्रमात भरत काळे यांनी आपली कन्या सायली हिच्या वाढदिवसा निमित्त रु.५००१/- ट्री गार्ड व झाडे लावण्यासाठी केली मदत

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०६/२०२४- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंढरपूर शहरातील सुंदर पंढरपूर हरित पंढरपूर, वृक्षप्रेमी ग्रुप व श्री विठ्ठल-रुक्मिणी योग प्राणायाम संस्थांच्या वतीने श्री संत गाडगेबाबा चौक येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास च्या दक्षिण बाजूस असलेल्या ओपन स्पेस मध्ये १०१ झाडे लावण्यात आली.

यावेळी बोलताना उपमुख्याधिकारी अँड सुनील वाळूजकर यांनी सांगितले की,५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून दरवर्षी जगभर साजरा केला जातो.जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना ५ जून १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन द ह्यूमन एन्व्हायर्नमेंट येथे झाली. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ यांनी १९७३ मध्ये पहिल्यांदा परिषद आयोजित केली होती.

यामध्ये सागरी प्रदूषण,वायु प्रदूषण, लोकसंख्या वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी चर्चा करण्यात आली.१४३ देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा दिन साजरा करताना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विविध पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम राबविले जातात.पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही जगातील व प्रत्येक देशातील नागरिकांची जबाबदारी आहे व याची जाणीव आपल्या सर्वांना असणे गरजेचे आहे म्हणून पंढरपूर शहरातील विविध संस्थांच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जागृत व्हावी व मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे म्हणून पंढरपूर नगरपरिषद, सुंदर पंढरपूर हरीत पंढरपूर, वृक्ष प्रेमी, वृक्षभिशी ग्रुप व श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्या वतीने शहरातील मुख्य रस्ते,अंतर्गत रस्ते ,ओपन स्पेस येथे किमान यावर्षी १००० झाडे लावण्याचा व ते जगवण्याचा संकल्प शपथ आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने घेण्यात आली.

श्री संत गाडगेबाबा चौक ओपन स्पेस व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक सांगोला रोड येथे १०० वृक्ष लागवड करून याचा शुभारंभ करण्यात आला.वरील सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील नागरिकांना, सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था यांना आवाहन करण्यात येते की,या वृक्ष लागवडीच्या लोक चळवळीमध्ये आपण सहभागी व्हावं व आपल्या घरातील कोणाचा वाढदिवस असल्यास किंवा एखाद्या आवडत्या व्यक्तीचा स्मृती दिन असल्यास त्यांच्या नावाने आपण शहरांमध्ये आपण सांगेल त्या ठिकाणी किंवा वरील सामाजिक संस्था ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी ट्री गार्ड सह वृक्षरोपण करावे तसेच ज्यांना या चळवळीमध्ये वेळेअभावी प्रत्यक्ष सहभागी होता येत नसेल त्यांनी ट्री गार्ड व झाडांची मदत करावी असे आवाहन वरील वृक्षप्रेमी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

ही वृक्ष लागवड चळवळ यशस्वी करण्यास अँड.सुनिल वाळूजकर,सोमनाथ होरणे, मुळीक, नवनाथ राऊत, विद्या रेपाळ, संजय कपडेकर, प्रशांत आगावणे,अँड.रामलिंग कोष्टी , रविंद्र कोडग, शरद वाघमारे, नागनाथ तोडकर,माऊली म्हेत्रे, थिटे, प्रकाश अलदार, प्रकाश परदेशी,नागेश मंजरतकर,महेश बडवे,जितेंद्र वजरिनकर,अँड.सुधाकर कांबळे,भाग्यश्री लिहिणे ,सुप्रिया शिंदे प्रयत्नशील आहेत.

या वृक्षारोपण कार्यक्रमाच्यावेळी सुंदर पंढरपूर हरित पंढरपूर ग्रुपचे भरत काळे यांनी आपली कन्या सायली हिच्या वाढदिवसा निमित्त रु.५००१/- ट्री गार्ड व झाडे लावण्यासाठी मदत निधी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *