बांबू स्वराज्य मोहिमेची भोर-स्वराज्यभूमीतून जोरदार सुरुवात

बांबू स्वराज्य मोहिमेची भोर-स्वराज्यभूमीतून जोरदार सुरुवात


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


बांबू आणि औषधी वनस्पती जतन- संवर्धन- रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

भोर जि.पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि १२/०६/ २०२४ – सध्या पर्यावरण,हवा,पाणी, वातावरण बदल,जैव विविधता, हरित उद्योजगता,वनीकरण, हरितीकरण आणि शाश्वत जीवनशैली हे विषय अत्यंत महत्त्वाचे बनले आहेत.या मुद्द्यांवर लोकजागृती आणि स्थानिक शेतकऱ्यांना पर्यावरणीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम बनवण्यासाठी बांबू स्वराज्य मोहिमे अंतर्गत स्वराज्याभूमी भोर येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचा उद्देश

. हरित क्षेत्र वाढविण्याची गरज आणि पर्यावरण विषयक प्राथमिकता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना बांबू आणि औषधी वनस्पती जतन-संवर्धन-रोपण-उद्योजकता विषयक माहिती व मार्गदर्शन प्रदान करणे.

·पर्यावरणीय समस्यांचे वैज्ञानिक पद्धतीने निराकरण आणि शाश्वत जीवनशैलीची अंमलबजावणी

· बांबू आणि औषधी वनस्पतींच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक स्त्रोत वाढवण्याची संधी उपलब्ध करणे

कार्यशाळेतील मुख्य आकर्षण:

या विशेष कार्यशाळेत बांबू स्वराज्य मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.या कार्यशाळेत मान्यवरांची उपस्थिती, तज्ञ मंडळींची व्याख्याने,विविध शासकीय योजना,तज्ञ-संशोधक-शासकीय अधिकारी- शेतकरी परिसंवाद इ. विषयक उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून बांबू आणि औषधी वनस्पती विषयक ख्यातनाम अभ्यासक, अधिकारी,शेतकरी,उद्योजक, संशोधक अजित भोसले,प्रा.डॉ.दिगंबर मोकाट, अशोक सातपुते, आकाश मल्लेलवार, घनश्याम मेश्राम, महावीर जंगटे, संजीवन गायकवाड, गणपत बबन गुजर,पंकज करवंदे,धनंजय गोसावी,डॉ.श्रीपाद महामुनी, किरण अभ्यंकर यांनी बांबू व औषधी वनस्पती ओळख, महत्व, व्यापारी तत्वावर लागवड, प्रक्रिया, उपयुक्तता, विपणन, बाजारपेठ, विविध शासकीय योजना, विक्री व्यवस्थापन, व्यापारी तत्वावर लागवड व मूल्यवर्धन अशा विविध विषयांवर उपस्थितांना दृक-श्राव्य व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेसाठी भोर,राजगड (वेल्हा), मुळशी, पुरंदर, मावळ,पुणे, हवेली, जुन्नर, मंचर, सातारा, धुळे, जळगाव, परभणी, जालना विभागातून १५० हून अधिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. निसर्ग अभ्यासक, पत्रकार, सामाजिक व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजन:

या कार्यशाळेचे आयोजन पुणे वनविभाग- प्रादेशिक (भोर उपविभाग), बायोस्फिअर्स संस्था,बांबू स्वराज्य मोहीम-संकल्प सुराज्याचा; बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, चंद्रपूर; क्षेत्रीय सह सुविधा केंद्र-पश्चिम (राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय), वनस्पतीशास्त्र विभाग – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे; महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भोर, इकोस्फिअर यांच्या एकत्रित प्रयत्नातून आणि संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यशाळेचे समन्वयक डॉ.सचिन अनिल पुणेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विठ्ठल दानवले यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती शीतल राठोड यांनी आभार मानले. शिवाजी राऊत यांनी उत्तम नियोजन केले. सदर कार्यशाळा हि निःशुल्क होती. अशोक खडसे, संचालक- बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांचे उचित सहकार्य व संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभले.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading