स्वेरी फार्मसीच्या प्रा.डी. जे. यादव यांना पीएच.डी.

स्वेरी फार्मसीच्या प्रा.डी.जे.यादव यांना पीएच.डी. प्राप्त

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०४/२०२४- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमधील प्रा.दत्तात्रय जालिंदर यादव यांना नुकतीच अहमदाबाद गुजरात मधील निरमा विद्यापीठाकडून फार्मसीमध्ये पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली.

सोल्यूब्लीटी अँड बायोअव्हेलॅब्लीटी इनहान्समेंट ऑफ पुअर्ली वॉटर सोल्युबल एपीआय फॉर कॉस्ट इफेक्टिव फॉर्म्युलेशन या विषयावर त्यांनी आपला शोधप्रबंध निरमा या विद्यापीठास सादर केला होता.

डॉ.जिग्नाशा सावजानी यांच्या मार्गदर्शनात आणि स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या सहकार्याने त्यांनी फार्मसीमधील पीएच.डी.पूर्ण केली असून त्यांना महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांचेही सहकार्य लाभले.

डॉ.डी.जे यादव यांनी पीएच.डी.च्या संशोधनात एचआयव्ही च्या औषध उपचारासाठी लागणाऱ्या अँटी व्हायरल औषधाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध प्रयोग केले. डॉ.डी.जे यादव यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आजपर्यंत एकूण सात संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत तसेच नामांकित प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये दोन बुक चॅप्टर्स देखील त्यांनी प्रसिद्ध केले आहेत.या संशोधना दरम्यान त्यांनी अहमदाबाद येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपर पेपर्सचे सादरीकरण केले आहे. डॉ.डी.जे यादव हे स्वेरीच्या फार्मसी महाविद्यालयात गेल्या ८ वर्षापासून ज्ञानदान करत आहेत. त्यांनी बी.फार्मसी शिक्षण स्वेरी मधून पूर्ण केले.

पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुंबईमधील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील प्रा. डॉ.भास्कर थोरात यांच्या हस्ते डॉ.यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ.पद्मा थोरात,भानुदास वाघमारे, सौ.जमुना वाघमारे, पालक,स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, स्वेरीचे विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ.डी.जे.यादव यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *