श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा

श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


आंबवडे/ज्ञानप्रवाह न्यूज –आंबवडे येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे १९९८-९९ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. ७ एप्रिल २४ रोजी संपन्न झाला.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक एस एस शिवतरे सर होते.तत्कालीन शिक्षक आर बी बारदेसकर सर ,एस बी सावंत सर, बी ए पाटील सर, एन ए दाभोळे सर,एच डी सावंत सर ,‌श्री माळी व शाळेचे मुख्याध्यापक सुनील थोपटे सर उपस्थित होते.

शाळेसाठी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची छोटी मुर्ती भेट दिली.शाळेच्या दुरूस्ती साठी या बॅचने मदत करावी असं आवाहन मुख्याध्यापक सुनील थोपटे सर यांनी केल्यानंतर त्याला ९९ च्या बॅचने सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसात निधी उभा करून छत दुरूस्तीचं काम सुरु करू असा शब्द दिला.

तत्कालीन शिक्षक बी ए पाटील सरांनी शाळेच्या छत दुरूस्तीसाठी पाच हजार रुपये रोख स्वरूपात दिले त्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला व आभार मानले.

आम्ही दिलेल्या शिक्षणाचा लाभ घेऊन मुले विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचं पाहुन समाधान वाटलं आयुष्यात आई वडिलांची सेवा करा, थोरा मोठ्यांचा मान राखा , गुरूजनांना विसरू नका अहंकार बाळगु नका. एकमेकांचा आदर करा अशी भावना सरांनी व्यक्त केली.

भोर वेल्ह्याचे माजी आमदार व‌ आंबवडे गावचे भाग्यविधाते कै संपतराव अण्णा जेधे असताना शाळा खुप प्रगत होती मात्र आता शाळेची अवस्था पाहुन दुःख वाटत आहे अशी खंत शिक्षकांनी व्यक्त केली.मदतीसाठी तत्पर असल्याचंही सांगितलं.

या स्नेहसंमेलनासाठी तुकडी अ व ब मधील ५४ माजी विद्यार्थी हजर होते.सुरवातीला दीप प्रज्वलनानंतर दिवंगत विद्यार्थी व शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना २५ वर्षांनंतर भेटुन खुप आनंद वाटला असल्याचे सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांना भेट स्वरूपात गुरु शिष्याची प्रेरणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांची भक्ती शक्ती मुर्ती भेट देण्यात आली. सर्व मुलांना आठवण म्हणुन स्वतः चे नाव असलेले सन्मान चिन्ह देण्यात आले.

या मेळाव्यासाठी पंकज मानकुंबरे ,योगेश खोपडे ,पांडुरंग जेधे,विक्रम जेधे,कविता खोपडे,कविता घारे,मिनल जोशी,शरद शेडगे, विनायक शेडगे, ज्ञानेश्वर झुनगारे, गणेश घोरपडे, शिवाजी मोहिते यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

या मेळाव्याचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन पंकज मानकुंबरे यांनी केले. आभार संदीप कोंढाळकर व पांडुरंग जेधे ,रेश्मा वर्टे यांनी आभार मानले.स्नेहभोजनानंतर पुन्हा एकदा लवकरच भेटण्याची अपेक्षा व्यक्त करत या मेळाव्याची सांगता झाली.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading