अपयशी ठरूनही रहाणे आणि पुजारा हे संघात कायम का आहेत, विराट कोहलीने केला मोठा खुलासा
कोहली पुढे म्हणाला की, ‘पुजारा आणि रहाणे हे खेळाडू ज्या प्रकारचे आहेत आणि त्यांनी गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये जे काही केले आहे, यासाठी मी त्यांना पाठीशी घालत राहीन, असे मी याआधीही म्हटले आहे. त्यांनी नाजूक परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे, तुम्ही दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यांनी केलेली महत्त्वपूर्ण भागीदारी पाहू शकता. त्यामुळे आपल्याला तेवढी धावसंख्या उभारता आली. तेवढ्या धावसंख्येच्या जीवावर आपण लढू शकलो.’
विशेष गोष्ट म्हणजे, पुजारा आणि रहाणेची कामगिरी दक्षिण आफ्रिकेत फारशी चांगली झालेली नाही. तीन कसोटी सामन्यांत ते फार काही करू शकले नाहीत. भारतीय संघाला मधल्या फळीतील इतर फलंदाजांचे सहकार्य हवे होते, पण तसे झाले नाही. यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त करत दोघांनाही संघात ठेवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यात काही माजी खेळाडूंचाही समावेश होता. तिसऱ्या कसोटीत पुजारा आणि रहाणे यांनी निराशाजनक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे आता पुढच्या सामन्यात या दोघांना संधी मिळणार की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.