Omicron In India : ओमिक्रॉन व्हेरिएंटचा समूह संसर्ग सुरू!; ‘या’ स्टडी रिपोर्टने वाढवली देशाची चिंता


हायलाइट्स:

  • ओमिक्रॉन व्हेरिएंटचा समूह संसर्ग सुरू.
  • राजधानी दिल्लीने वाढवली देशाची चिंता.
  • ताज्या स्टडी रिपोर्टमध्ये धक्कादायक दावे.

नवी दिल्ली:ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात करोनाची तिसरी लाट धडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांत रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीत रेकॉर्डब्रेक करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आधीच सतर्कता बाळगण्यात येत असताना चिंतेत भर घालणारा एक स्टडी रिपोर्ट समोर आला आहे. ( Omicron In India Latest Breaking News )

वाचा : करोनाने केली कोंडी!; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, या तारखेपर्यंत…

भारतात कर्नाटकात ओमिक्रॉनचे पहिले दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर इतर राज्यांत या विषाणूचा फैलाव झाला. देशातील एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता सहा हजाराच्यावर गेली आहे. अशावेळी दिल्लीने देशाची चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. सुरुवातीला ओमिक्रॉन बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण ट्रॅव्हल हिस्ट्री असणारे होते. आफ्रिकन देश तसेच युरोपीय देशांतून परतलेल्या अनेक प्रवाशांना ओमिक्रॉनने गाठले. मात्र, ही स्थिती वेगाने बदलत असून दिल्लीत ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाल्याचा दावा अभ्यासाअंती करण्यात आला आहे.

वाचा : राजधानी दिल्लीत करोनाचा स्फोट; रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ

‘दिल्लीत डेल्टा व्हेरिएंटची जागा आता ओमिक्रॉन व्हेरिएंटने घेतली आहे. आकडे वेगाने बदलत आहेत आणि त्याचे कारण समूह संसर्ग हे आहे’, असा निष्कर्ष अभ्यासकर्त्यांनी काढला आहे. ओमिक्रॉन बाधितांच्या ताज्या आकडेवारीवर नजर मारल्यास ६०.९ टक्के रुग्णांनी कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. त्यांना स्थानिक पातळीवरच या विषाणूची लागण झाली आहे. ही बाब येत्या काळात नवी आव्हाने निर्माण करू शकते, अशा शब्दांत अभ्यासकर्त्यांनी सावध केले आहे. इन्स्टिट्युट ऑफ लिवर अँड बिलियरी सायन्सेसच्या क्लिनिकल व्हायरॉलॉजी विभागाने दिल्लीतील स्थितीचा अभ्यास केला आहे. त्यात दिल्लीमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या समूह संसर्गाची सुरुवात झाल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एकूण बाधितांपैकी ६० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. ओमिक्रॉन बाधितांमधील ८७ टक्के रुग्णांनी कोविडवरील दोन्ही लस घेतलेल्या होत्या. ६१ टक्के रुग्णांना समूह संसर्गामुळे बाधा झाली आहे, असेही स्पष्ट झाले आहे.

लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांच्यापेक्षा युवावर्ग व त्यातही पुरुषांना मोठ्या प्रमाणात संसर्गाची लागण होत असल्याचे अभ्यासकर्त्यांनी नमूद केले असून ओमिक्रॉनवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसचा बूस्टर डोस देण्याची आवश्यकता आहे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

वाचा : करोनावरील उपचार: ‘ही’ तीन औषधे घेण्याचा केंद्राने दिला सल्लाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: