सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतीच्या वादातून हाणामारी, एकाचा मृत्यू, दुसरा फरार!


बीड : शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांच्या झालेल्या भांडणात, एका भावाचा मृत्यू झाला आहे. भांडणं एवढी टोकाची होती, की तब्बल महिनाभर एका भावाला रुग्णालयात रहावं लागलं. दुर्दैवाने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. संभाजी वडजकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

दरम्यान या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात 307 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तरी देखील आरोपींना अटक झाली नव्हती, आज अखेर यात भाऊ संभाजी वडजकर यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. मृतास एक मुलगा आणि चार मुली असून या सर्वांनी जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.

दोन सख्ख्या भावांची शेतीच्या वादातून हाणामारी झाली. संभाजी वडजकर यांच्या भावाने आरोपी भावाने त्यांना जबरदस्त मारहाण केली. मारहाणीनंतर तेलगाव-धारूर रोडवर संभाजी वडजकर यांना फेकून देण्यात आला. सुरुवातीला अपघात झाल्याचं भासवण्यात आलं. मात्र अधिक तपासानंतर 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

परंतु अजूनपर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. किमान आता तरी आरोपीस अटक करुन न्याय द्यावा, अशी मागणी मृताची मुलं करत आहेत. त्यासाठी बीड पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयाबाहेर मृत व्यक्तीच्या मुलांनी ठिय्या मांडला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: