डॉ. नीरज कदमला अटक; गर्भपात प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता


हायलाइट्स:

  • आर्वी येथील गर्भपात प्रकरण
  • आरोपी संख्या झाली सहा
  • प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता

वर्धाः वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे ९ जानेवारी रोजी लैंगिक अत्याचारासह गर्भपात प्रकरणात दाखल गुन्ह्याचा तपासात पोलिसांनी रुग्णालय परिसरातुन बेकायदेशीर गर्भपाताचे रहस्य बुधवारी १२ रोजी उलगडून काढले. याप्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आई व वडिलांसह गर्भपात करणारी डॉ. रेखा कदम आणि २ परिचारिका अशा ५ जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणात डॉ. नीरज कदम याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

आर्वी शहरात असलेल्या कदम रुग्णालयात गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटर आहे. गर्भपात केंद्र हे डॉ. रेखा कदम हिच्या सासू डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर आहे. तर सोनोग्राफी सेंटर हे डॉ. रेखा कदम आणि डॉ.नीरज कदम या दोघांच्या नावाने आहे. पोलिसांनी तपासादरम्यान डॉ. रेखा कदम हिला सुरुवातीलाच अटक केली होती. रेखा कदम हिच्या पोलीस कोठडीतील तपासात झालेल्या चौकशीवरुन १२ जानेवारी रोजी रुग्णालय परिसरातील बायोगॅस चेंबरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गर्भपाताचे भ्रुण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासणी केली. मात्र, याच दरम्यान पोलिसांना त्याच चेंबरमध्ये १२ कवट्या अन् ५४ हाडं आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना सहकार्य करणाऱ्या दोन परिचारिकांनाही अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांनी या प्रकरणात डॉक्टर नीरज कदमला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. कदम रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र हे डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांच्या नावाने आहे.

वाचाः ‘अजितदादांवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा’

याच कदम रुग्णालयाच्या गर्भपात केंद्राचा परवाना हा डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे असल्याने त्यांनाही चौकशीसाठी सूचनापत्र पोलिसांनी बुधवारी दिले होते. मात्र, या दरम्यान शैलेजा कदम यांची प्रकृती खालावली. शुक्रवारी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णायलात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळपासूनच कदम रुग्णालय परिसरात डॉ. नीरज कदम यांना सोबत घेत आर्वी पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना कदम यांच्या घरात कळविटीची कातडी आढळली तर आरोग्य विभागाच्या पथकला काही औषधी आणि इंजेक्शन सुद्धा मिळाले असून ते आरोग्य विभागाने जप्त केले आहे. दिवसभर चाललेल्या तपासणीनंतर आर्वी पोलिसांनी डॉ. नीरज कदम यांना मध्यरात्री बेड्या ठोकल्या. त्यामुळे आता याप्रकरणात आरोपी संख्या सहावर पोहचली आहे.

वाचाः पालकांची चिंता वाढली! या जिल्ह्यात लहान मुलांभोवतीही करोनाचा विळखा होतोय घट्ट

डॉ. कदम रुग्णालयात असलेल्या गर्भपात केंद्राचा परवाना हा डॉ. शैलेजा कदम हिच्या नावावर होता. डॉक्टर शैलजा कदम या रेखा कदम यांच्या सासू आहे. तर सोनेग्राफी सेंटरचा परवाना डॉ. रेखा आणि डॉ. नीरज कदम यांच्या नावे होता. विशेष म्हणजे या दोघांचाही सोनोग्राफी केंद्राच्या परवान्याची मुदत १९ डिसेंबर २०२१ मध्येच संपली होती. परवाना नुतनीकरणासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे प्रस्ताव पाठविला असून परवाना नुतनीकरण प्रक्रियेत आहे. मात्र, गर्भपाताचा कुठलाही परवाना नसताना डॉ. रेखा कदम यांनी गर्भपात केला कसा, हा प्रश्न निर्माण होतो आहे.

वाचाः काय सांगता! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात करोना रुग्णांध्ये पुरुषांची संख्या अधिकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: