टीम इंडिया कधीच कोणाचे उधार ठेवत नाही; ४८ तासात द.आफ्रिकेचा हिशोब चुकता केला


नवी दिल्ली: भारताचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला आणि टीम इंडियाने कसोटी मालिका देखील गमावली. याच पाठोपाठ विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडले. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एका पाठोपाठ एक अशा धक्कादायक बातम्या समोर येत असताना एक आनंदाची बातमी आली आहे.

वाचा- कसोटी क्रिकेटमध्ये झाला नवा विक्रम; १४५ वर्षात कधीच असे झाले नव्हते

एका बाजूला द.आफ्रिकेकडून भारताचा पराभव झाला तर या पराभवाचे उत्तर ४८ तासात टीम इंडियाने दिले. आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पहिल्या लढतीत द.आफ्रिकेचा ४५ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात २३३ धावांचे लक्ष्य द.आफ्रिकेला दिले होते. भारताकडून कर्णधार यश धुलने ८२ धावांची शानदार खेळी केली. भारताने ४५.६ षटकात सर्वबाद २३२ धावा केल्या.

वाचा- विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या द.आफ्रिकेला पहिल्या षटकात धक्का बसला. राजवर्धन हंगरगेकरने चौथ्या चेंडूवर एथन जॉन कनिंघमला बाद केले. त्यानंतर विकी ओसवाल आणि राज बावा यांनी एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली. ३६व्या षटकापर्यंत द.आफ्रिकेने ४ बाद १३८ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर त्यांचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ १८७ धावांत बाद झाला. भारताकडून विकी ओसवालने ५ विकेट घेतल्या. त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

या सामन्यात द.आफ्रिकाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ११ धावांवर भारताने सलामीवीरांची विकेट गमावली. त्यानंतर एस राशिद आणि धुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. राशिदने ३१ धावा केल्या. तर निशांत सिंधूने २५ चेंडूत २७ धावांची महत्त्वाची खेळी केली. कौलाश तांबेने ३५ धावांचे योगदान दिले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: