माझी वसुंधरा अभियानातंर्गत ग्रामपंचायतीने परबागेसाठी दिले बियाणांचे वाण व झाड

माझी वसुंधरा अभियानातंर्गत ग्रामपंचायतीने दिले परबागेसाठी बियाणांचे वाण व एक झाड
   पंढरपूर / नागेश आदापुरे:-पर्यावरणाच्या जतन व संवर्धनासाठी पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी मकर संक्राती सणानिमित्त माझी वसुंधरा अभियानातंर्गत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात महिलांना परसबागेसाठी बियाणांचे वाण व एक झाड देण्यात आले.

यावेळी माझी वसुंधरा अभियानातंर्गत बचत गटातील 250 महिलांना परसबाग तयार करण्यासाठी पालक, मेथी, करडी, कोथिंबीर भेंडी, वांगे,,गवार, घोसावळे, दुधी भोपळा, मुळा अशा 11 प्रकारच्या बियाणे किटचे वाटप करण्यात आले व एक झाड देण्यात आले .आठ दिवसात गावांमध्ये 250 परसबाग तयार होणार आहेत. हा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करत आवश्यक नियमानुसार महिलांच्या उपस्थितीत घेण्यात आला . यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला

कार्यक्रमास ग्रा.पं.सदस्य सौ.सुनंदा देवळे माजी सरपंच सौ.सोनाली यादव, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, ग्रामसेविका ज्योती पाटील ,बचत गट समन्वयक राजश्री सुतार तसेच बचत गटातील महिला उपस्थिती होत्या. यावेळी उपस्थित महिलांना तिळगुळ व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन ग्रामपंचायतीच्यावतिने आभार मानण्यात आले .

   निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोक एकत्र आले पाहिजेत. माझी वसुंधरा या अभियानात प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य म्हणून प्रत्यक्ष सहभाग नोंदवून एक तरी झाड लावावे असे आवाहन गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे.

                     नारायण चिंचोली डस्टबीनचे वाटप  

  पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथेही आज मकरसंक्रांती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक घरात ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी संक्रांत निमित्ताने वाण म्हणून डस्टबीन चे वाटप महिलांना करण्यात आले.

    यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशधिन शेळकंदे यांनी माझी वसुंधरा या अभियानाचे महत्व सांगितले. या अभियानातून मंदिर परिसर व स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी पांडुरंग सह.साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे,सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, मंदिर समितीचे सर्व अध्यक्ष,सदस्य,महिला व ग्रामस्थ उपस्थित होते, हा कार्यक्रम कोरोनाचे नियम व अटीचे पालन करुन संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: