अ‍ॅशेसमध्ये इंग्लंडचा मानहानीकारक पराभव; ऑस्ट्रेलियाने ४-०ने मालिका जिंकली


होबार्ट : अ‍ॅशेस मालिकेपूर्वी सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने टीम पेनला राजीनामा द्यावा लागला आणि कर्णधारपदाची माळ पॅट कमिन्सच्या गळ्यात पडली. कर्णधार बनवल्यावर कमिन्सने जोरदार कामगिरी करत इंग्लंडचा दारुण पराभव केला. रविवारी (१६ जानेवारी) यजमानांनी पाचव्या कसोटीत १४६ धावांनी दमदार विजय साजरा केला. या विजयासह कांगारुंनी ऐतिहासिक अॅशेस मालिकेत ४-० असा एकतर्फी विजय मिळवला. कर्णधार पॅट कमिन्सने ४ सामन्यात २१ बळी घेतले, तर सामनावीर आणि मालिकावीर ट्रॅव्हिस हेडने ४ सामन्यांच्या ६ डावात २ शतकांसह सर्वाधिक ३५७ धावा केल्या.

वाचा- विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो

या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर २७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लिश संघाची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. आणि इंग्लंडचा संपूर्ण संघ ३८.५ षटकात १२४ धावांमध्ये गारद झाला. पाहुण्या संघाकडून जॅक क्रॉलीने ३६ धावा केल्या, तर रोरी बर्न्सने २६ धावा केल्या. डेव्हिड मलान (१०), कर्णधार जो रूटने (११) आणि मार्क वुड (११) यांनी दुहेरी धावसंख्या गाठली. इंग्लंडच्या इतर फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. दुसरीकडे पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

वाचा- टीम इंडिया कधीच कोणाचे उधार ठेवत नाही; ४८ तासात द.आफ्रिकेचा हिशोब चुकता केला

पाच सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना होता. आणि ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडपुढे विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन संघाला १५५ धावांत रोखले. मार्क वुडने ख्वाजा (११), स्टीव्ह स्मिथ (२७), बोलंड (८), ट्रॅव्हिस हेड (८), स्टार्क (१) आणि कर्णधार पॅट कमिन्स (१३) या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

वाचा- ‘तू पुढच्या कर्णधारासाठी डोकेदुखी सोडली आहे’; कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर अश्विनची प्रतिक्रिया

त्यानंतर ब्रॉडने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (०), ग्रीन (२३) आणि अॅलेक्स कॅरी (४९) या तिघांना आणि ख्रिस वोक्सने मार्नस लॅबुशेन (५) यांचे बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दहा गडी गमावून ३०३ धावा केल्या. त्यावेळी इंग्लंडने पहिल्या डावात दहा गड्यांच्या बदल्यात १८८ धावा केल्या. दुसऱ्या डावात १५५ धावा करत कांगारू संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: