पथदिव्यांची व पाणी पुरवठा योजनांची बीले शासनानेच भरावी अन्यथा तीव्र आंदोलन- ग्रामसंवाद सरपंच संघ

पथदिव्यांची व पाणीपुरवठा योजनांची बीले शासनानेच भरावी अन्यथा तीव्र आंदोलन करू – ग्रामसंवाद सरपंच संघाचा इशारा

ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावातील पथदिवे यांचे बीले शासन भरत असे परंतु मागील काही वर्षात शासनाने या बिलाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने भरावे असे आदेश काढले आहेत. वास्तविक ग्रामपंचायत उत्पन्न वाढ व वसुलीसाठी आजपर्यंत कोणत्याही सरकारने ठोस उपाय योजना केलेल्या नाहीत. त्यामुळे पथदिव्यांची बिले शासनानेच भरावीत अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.

   गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे ग्रामपंचायतची वसुली ठप्प झाली असून वीज वितरण कंपनीने  पथदिव्यांचे व पाणीपुरवठा योजनांच्या थकित बिलापोटी कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेतली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात अंधार पसरला आहे तर सर्वसामन्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच ही बिले पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून भरण्यासाठी सांगितले त्यामुळे सरपंच व ग्रामपंचायतमध्ये संताप व्यक्त केला जात आहे कारण 15 वा वित्त आयोगाचा निधी हा केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांची निर्मिती व आरोग्य स्वच्छता पाणी आदींसाठी असल्याने त्यावर महाराष्ट्र शासनाने डोळा ठेवणे म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाला खीळ घातल्यासारखे आहे.

 कोरोना काळामध्ये गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी केलेली जीवापाड मेहनत करत असताना अशा  परिस्थितीत मदतीचा हात द्यायचे सोडून शासनाने ग्रामपंचायतींना वाऱ्यावर सोडून देत आहेत हे खूप खेदजनक व अन्यायकारक आहे. पूर्वीप्रमाणे शासनाने लाईट बिल व पाणीपुरवठा बिल भरण्या करता 15 व्या वित्त आयोगातील पैशाला हात न लावता शासनस्तरावरून निधी उपलब्ध करून थकीत बिले भरण्यात यावी अशी जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व उपकार्यकारी अधिकारी श्रीमती चंचल पाटील यांना निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा दिला आहे.  

   यावेळी ग्रामसंवाद सरपंच संघ या सरपंच संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतिश भुई , पश्चिम महाराष्ट्र संघटक भास्कर भोसले, अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सुनील राजमाने, उपाध्यक्ष कोमल ताई करपे,सभापती सिद्धार्थ गायकवाड,रफिक नदाफ,पुष्पावती आवटे तालुकाध्यक्ष संगमेश पाटील,नसीर जहागीरदार,दीपक चव्हाण,संभाजी मंडलिक ,महादेव काकडे,सचिन भिंगारे,संकल्प जाधव व इतर सर्व पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: