परभणीविषयी मला पूर्वी पासूनच आस्था आहे,हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य –उपमुख्यमंत्री अजित पवार

परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

परभणीविषयी मला पूर्वीपासूनच आस्था आहे,हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

परभणी,दि.26 एप्रिल 2025 (जिमाका) : परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल. मात्र मूलभूत सोयीसुविधांची कामे करताना अतिशय काटेकोरपणे नियोजन करुनच कामे गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत दिले.

महानगरपालिकेच्या सभागृहात आज श्री. पवार यांनी परभणी महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचा आढावा घेतला.बैठकीस पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, खासदार बंडू जाधव, आमदार सर्वश्री विक्रम काळे, राहूल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,मनपा आयुक्त धैर्यशील जाधव आदींसह माजी सदस्य व महानगरपालिकेचे अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.

श्री. पवार यांनी महानगरपालिकेशी संबंधित शासनस्तरावरील प्रलंबीत प्रस्ताव, महानगर पालिकेची अर्थिक स्थिती, आस्थापना विषयक बाबी,चालू विकास कामे,रस्ते, समांतर पाणीपुरवठा,भूयारी गटार योजना, नवीन नाटयगृह, घनकचरा व्यवस्थापन, एसटीपी प्लान्ट, आरोग्य सुविधा आदींचा सविस्तर आढावा घेतला.

श्री. पवार म्हणाले की, परभणीविषयी मला पूर्वीपासूनच आस्था आहे, हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. मनपाने नागरिकांना अतिशय दर्जेदार मूलभूत सुविधा द्याव्यात. भुयारी गटार योजना, नवीन नाट्यगृहाचे बांधकाम, समांतर पाणीपुरवठा योजना, एसटीपी प्लान्ट, घनकचरा व्यवस्थापन, नवीन क्रीडा संकुलाच्या कामासाठी निश्चितपणे सहकार्य केले जाईल.

ही सर्व कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी मनपा प्रशासनाने देखील दक्षता घ्यावी. कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यावर भर असावा. रस्ते तयार करताना सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय ठेवून भाविष्यातील कामांचा विचार करुनच रस्त्यांची कामे करावीत. मनपा कर्मचाऱ्यांचे आस्थापना विषयक प्रश्नही सोडविले जातील, अशी ग्वाहीही श्री. पवार यांनी यावेळी दिली. श्री. जाधव यांनी सादरीकरणाव्दारे विकासकामांची माहिती दिली.

Leave a Reply

Back To Top