डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत कळस-धानोरी व जनता वसाहतीत शिवसेनेची भव्य रॅली shivsena rally: उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
पुणे महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत कळस-धानोरी व जनता वसाहतीत शिवसेनेची भव्य रॅली; महिला, युवक व गोरगरीबांसाठी महत्त्वाच्या योजना जाहीर.

Pune mahanagarpalika news पुणे | दि. ७ जानेवारी २०२६ : पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रचाराचा जोर वाढवला असून मंगळवारी दि.६ जानेवारी कळस-धानोरी, लोहगाव परिसर तसेच जनता वसाहतीत भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या रॅलींना शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे nilam gorhe यांनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रचाराला बळ दिले.
प्रभाग क्रमांक १ (कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित) येथील उमेदवार जैवळ गिरीश भीमराव, बनसोडे हेमलता विवेक, रावते प्रदीप लक्ष्मण व म्हस्के मीनाक्षी सतीश यांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीदरम्यान शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

तसेच प्रभाग क्रमांक २८ (जनता वसाहत व हिंगणे खुर्द) येथील उमेदवार मीरा राहुल तुपेरे,नलिनी योगेश आढाव, कुडले शीतल अतुल व नितीन कैलास हनमघर यांच्या प्रचारासाठीही डॉ.गोऱ्हे यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. यावेळी युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, संदीप शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
महिला, युवक आणि गोरगरीबांसाठी महत्त्वाच्या योजना
रॅलीदरम्यान बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, सत्तेत आल्यावर पीएमपीएमएल बसमध्ये महिलांसाठी अर्धे तिकीट,प्रत्येक प्रभागात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना,युवकांसाठी कौशल्य विकासा द्वारे रोजगार आणि गोरगरीबांसाठी वैद्यकीय सहाय्य या योजनांवर विशेष भर दिला जाणार आहे.

जनता वसाहत शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ
जनता वसाहतीतील सभेत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की,या मतदार संघाने शिवसेनेला पाच वेळा विजयी केले.शिवसेनेशी जनतेचे भावनिक नाते असून हा मतदारसंघ शिवसेनेचा हक्काचा आहे.आंबील ओढा वस्ती पाडण्याच्या कारवाईवेळी पीडितांचा आवाज न ऐकणाऱ्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांची त्यांनी आठवण करून दिली.त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच तात्काळ स्थगिती देत गरीबांच्या बाजूने ठाम भूमिका घेतल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बहुमताने विजयी करण्याचे आवाहन
कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रचाराची सांगता केली.

