विद्यापीठात एकत्र बसलेल्या तरुण-तरुणीवर कट्टरतावाद्यांकडून हल्ला; २१ विद्यार्थी जखमी


पंजाब, पाकिस्तान :

विद्यापीठात शिक्षण घेणारे तरुण आणि तरुणी कॅन्टीनमध्ये एकत्र बसण्याला काही इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून आक्षेप घेण्यात आला. इतकंच नाही तर विद्यापीठाच्या प्रांगणात घुसलेल्या या कट्टरतावाद्यांकडून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात २१ विद्यार्थी गंभीर जखमी झालेत.

पाकिस्तानच्या पंजाब विद्यापीठात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लैंगिक अभ्यास विभागच्या बाहेर एका कॅन्टीनमध्ये एक तरुण आणि एक तरुणी बसले होते. यावेळी ‘इस्लामी जमियत तुलाबा‘ या कट्टरतावादी संघटनेनं या तरुण-तरुणीच्या एकत्र बसण्यावर आक्षेप घेत त्यांना धमकावत इथून निघून जाण्यास सांगितलं.
कट्टरतावाद्यांच्या या अरेरावीला संबंधित विद्यार्थ्यानं आणि विद्यार्थिनीनं विरोध दर्शवला. तेव्हा संघटनेच्या सदस्यांपैंकी एकानं तरुणाच्या कानाखाली मारली, अशी माहिती विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्यानं दिलीय.

India Pakistan: ‘भारतीय क्षेपणास्र पाकिस्तानात कोसळणं धोकादायक संदेश’Ukraine Crisis: युक्रेनियन चॅनलवर दिसला राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या आत्मसमर्पणाचा व्हिडिओ आणि…
संघटनेनं तरुणाला घेरल्याचं पाहिल्यानंतर त्याच्या मदतीसाठी विद्यापीठातील इतर विद्यार्थी संघटना धावून आल्या. त्यांनी कट्टरतावाद्यांना विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला मारहाण करण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, कट्टरतावाद्यांकडून या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनाही मारहाण करण्यात आली.

यावेळी, कट्टरतावादी आणि विद्यार्थ्यांत लाठ्या-काठ्यांनी झडप झाली. यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. त्यांना जवळच्याच एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलीय.

पाकिस्तानात अद्यापही अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये महिला आणि पुरुषांमधील भेदभाव वेळोवेळी समोर आलाय. महिलांना समान संधी देण्यावर आणि पुरुषांच्या बरोबरीनं बसण्यावर पाकिस्तानातील कट्टरतावादी संघटनांकडून तीव्र आक्षेप घेतला जातो.

Japan Earthquake: जपानला भूकंपाचा हादरा; दोघांचा मृत्यू, धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली…
Gretta Vedler: पुतीन यांच्यावर टीका करून चर्चेत आलेल्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेहSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: