General news

मॅन्युअल स्कॅवेंजर एक्टला पंढरपूरमध्ये केराची टोपली

मॅन्युअल स्कॅवेंजर एक्टला पंढरपूर मध्ये केराची टोपली

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – मानवी मैला टाकी साफ करताना एक तरुण टाकीत पडला.मानवी मैला उचलणे व उचलण्यास सांगणे यावर प्रतिबंध असूनही पंढरपूरमध्ये सर्रास अशा प्रकारचे कामे चालू आहेत.पंढरपूर प्रभाग क्रमांक एक मध्ये न्यू सातारा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा शेजारील एका व्यक्तीच्या घराची सेप्टिक टॅंकची टाकी साफ करताना राकेश उमेद सोलंकी वय वर्ष ३० याला साफसफाई करताना विषारी वायू मूळे चक्कर आली व तो मैल्यांच्या टाकीत पडला.टाकीतील विषारी वायूमुळे त्या तरुणाच्या मेंदूवर सूज, छाती व पोटामध्ये इन्फेक्शन झालेले आहे.त्याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार पंढरपूर येथे सुरू आहेत.देशामध्ये मानवी विष्ठा हाताने उचलणे यावर प्रतिबंधक कायदा लागू असूनही पंढरपूर शहरांमध्ये हे काम चालू असल्याचे आढळले आहे.करोडो रुपये खर्च करूनही हे काम चालूच असल्याचे उघडकीस आले आहे.

 

पंढरपूर नगरपालिका प्रशासन महाराष्ट्र सरकारला कागदपत्रे कळवते की पंढरपूरमध्ये एकही मॅन्युअल स्कीवेंजर कर्मचारी आढळून येत नाही.अशा प्रकारे खोटी माहिती शासनाला दिल्यामुळे हे कर्मचारी त्यांच्या हक्कापासूनही वंचित होतात.हे काम पडद्यामागे चालूच आहे.

आज अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्यावतीने राकेश सोलंकीच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीवरती मॅन्युअल स्कॅव्हेजिंग ऍक्ट नुसार कारवाई करण्या बाबत पंढरपूर तहसीलदार सचिन लंगुटे‌ यांना निवेदन दिले आहे.राकेश सोलंकी यांची आई जिजा सोलंकी, पत्नी आरती सोलंकी,भाऊ राजेश सोलंकी यांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण , उपविभागीय पोलीस अधिकारी,प्रांत अधिकारी पंढरपूर विभाग,वरिष्ठ पोलीस अधिकारी पंढरपूर व पंढरपूर नगरपालिका चे मुख्याधिकारी यांना देण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष गुरु दोडिया,प्रमोद वाघेला,हेमंत मेहडा , रजनीश गोयल ,प्रमोद मेहडा,अमित वाघेला,ललित सोलंकी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *