म्हसवड येथील माणदेशी महिला बँकेची यशस्वी 25 वर्षे

म्हसवड येथील माणदेशी महिला बँकेची यशस्वी 25 वर्षे Successful 25 years of Mandeshi Mahila Bank at Mhaswad
 म्हसवड - म्हसवड ता.माण जि.सातारा येथील माणदेशी महिला बँकेची स्थापना १९९७ रोजी झाली.बँकेची स्थापना झालेपासून ग्रामीण भागा तील महिला आर्थिक दृष्ट्या सबळ व्हावी यासाठी माणदेशी महिला बँक सतत प्रयत्नशील आहे. चेतना सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली माणदेशी महिला बँकेचे नाव जगभर केले आहे .विविध प्रकारचे उपक्रम राबवून विदेशातील सामाजिक संस्थांची मदत घेऊन बँकेने अनेक महिलांचे पुनर्जीवन घडवून आणले. त्यांच्या कार्याची दखल देशातील विविध स्तरातून घेतली गेली,अगदी कौन बनेगा करोडपती ने सुद्धा त्यांना आमंत्रण देऊन बोलावले होते. अशा महान कार्य असणाऱ्या बँकेला २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नितिन दोशी यांनी बँकेच्या म्हसवड शाखेचे जनरल मॅनेजर विजय कोळपे आणि व्यवस्थापक सौ.कोरे मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. 

   यावेळी माणदेशी महिला बँकेच्या संचालिका सौ.राजश्री दोशी, नूतन पवार,निशांत पिसे,चोरमले मॅडम यांच्यासह कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: