पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मासाळवाडी येथे अभिवादन
ज्ञानवर्धिनी हायस्कूल येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन

म्हसवड ता.माण / ज्ञानप्रवाह न्यूज- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त मासाळवाडी ता.माण जि.सातारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी म्हसवड चे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी,डॉ.वसंत मासाळ,नानासाहेब मासाळ, महेश पतंगे आदींसह मासाळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ज्ञानवर्धिनी हायस्कूल ता.माण येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून इयत्ता 10 वी मधील विद्यार्थी सौरभ ढाले याला शालेय पुस्तक व शालेय साहित्य अहिंसा पतसंस्थे कडून देण्यात आले.म्हसवड चे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन दोशी,अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संचालक लुनेश वीरकर सर व ज्ञानवर्धिनी हायस्कूल चे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.