ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत
न.प.शाळा क्रं.९ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – 16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी संपूर्ण राज्यभरात विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमांद्वारे स्वागत करण्यात आले.फलटण जि.सातारा मध्येही या दिवसाचे औचित्य साधून नगरपरिषद शाळा क्रमांक ९ च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

यामध्ये ढोल ताशांच्या गजरात पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली आणि विद्यार्थ्यांना प्रवेश द्वारातून आत प्रवेश करत असताना फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तके व दप्तर वाटप करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.अर्चना बामणे, मुख्याध्यापक संदीप निकम सर, व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक समाधान भोई तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

