पालकमंत्री भरणे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही – शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे

पालकमंत्री भरणे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही – शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांचा इशारा Guardian Minister Bharne will not be allowed to roam in district – Shiv Sena district chief Sambhaji Shinde’s warning

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या व्यक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या असून शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत,त्यांच्या बाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढलेले उद्गार हे निषेधार्ह असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे.

   आज देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांनी हे बेताल वक्तव्य केले आहे.या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप जिल्ह्यात सोशल मीडियावर फिरू लागताच जिल्हा शिवसेनेत संतापाची लाट उसळली असून शिवसेना जिल्हा प्रमख संभाजी शिंदे हे आक्रमक झाले आहेत. यापुढे पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिल्यामुळे आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते याबाबत काय भुमीका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले की, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत माफी मागितली असून तो विषय आता संपला आहे.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: