DVP पिपल्स मल्टीस्टेट मुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल – अभिजीत पाटील

दि पिपल्स मल्टीस्टेट,शाखेचे मोहोळ येथे उदघाटन संपन्न DVP People’s Multistate will boost economic growth – Abhijeet Patil
     पंढरपूर /नागेश आदापूरे :- DVP उद्योग समूहाचे आणि धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून DVP उद्योग समूहाची झेप ही सहकार क्षेत्रात कार्यरत असून आता अर्थकारणात पाऊल टाकत आज मोहोळ येथे दि पिपल्स मल्टीस्टेट या नवीन शाखेचे उद्घाटन नागनाथ महाराजांचे प.पु.राजेंद्र खर्गे महाराज, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष दिपक गायकवाड, पद्माकर आप्पा देशमुख, मा.उपसभापती बाळासाहेब गायकवाड ,प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, नगरसेविका सौ.सिमाताई पाटील,लोकसेवक संजय क्षीरसागर, पोलीस निरीक्षक अशोक सायकर,नगराध्यक्ष शौकीन तलफदार , भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, प्रवीण डोके आदींच्या शुभहस्ते करण्यात आले. 

 बँकेच्या माध्यमातून अधिक तरूणांना रोजगार व उद्योग उभारणीस मदत होईल. नागरिकांचे हित समोर ठेवून विविध योजना राबवण्यात येतील. ऑनलाईन बॅकींग सेवाही सुरू करण्यात आली आहे.बँकेचा ठेवीचा व्याजदर हा अधिक असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी ठेवी द्याव्यात यामुळे मोहोळ व आजूबाजूच्या गावांचे अर्थकारण नक्कीच सुधारणीस हातभार लागेल असे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले. 

याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे संचालक रणजीत भोसले, संदीप खारे,सुहास शिंदे,दीपक आदमिले, आबासाहेब खारे,दिनेश शिळ्ळे, जयंत सलगर, मल्टीस्टेटचे चेअरमन संदेश दोशी, सुरज पाटील, श्रीनिवास बोरगावकर, सचिन खरतडे, महेश जावळे, कुलदीप कौलगे तसेच मोहोळ मित्र परिवार उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: