त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेमध्ये पिक कर्ज घेण्यासाठी गेल्यास मोठी अडचण

त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेमध्ये पिक कर्ज घेण्यासाठी गेल्यास मोठी अडचण Therefore, it is a big problem for farmers to go to the bank for crop loans
 पंढरपूर /प्रतिनिधी - पंढरपूर मंगळवेढा विधान सभा मतदार संघाचे भाजपा आमदार समाधान आवताडे यांचे पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांमधील शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यासाठी बँका जाणीवपूर्वक नाहक ञास देऊन शासन नियमांमध्ये नसलेली जाचक कागद पञांची पुर्तता करण्यास भाग पाडून पिक कर्ज घेण्यासाठी बँकेत येणार्या शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडत आहे. शेतकऱ्यांच्या पिक पाण्याची नोंदही जमीन सात बारावर ठराविक महिन्यांमध्येच धरली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेमध्ये पिक कर्ज घेण्यासाठी गेल्यास मोठी अडचण निर्माण होते . शासनाने पिक कर्ज हे शेतकऱ्यांना सुलभरित्या देण्याकरिता अगदी कमीत कमी कागदपञांच्या आधारे लवकरात लवकर पिक कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता यामधील जाचक कागदपञांची अट रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला परंतु पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील बँका या पीक कर्ज देण्याकरिता शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचे दिसून येत आहे.

 त्यामुळे भाजपा आमदार समाधान आवताडे यांनी या मतदार संघाचे विधानसभा आमदार या नात्याने पंढरपूर व मंगळवेढा येथील ज्या- त्या तालुका लेवलवर बँक अधिकारी यांची उपविभागीय अधिकारी व सहाय्यक निबंधक यांच्या माध्यमातून बैठक घेऊन बँक अधिकारी यांना सुचना देऊन या पीक कर्जावर मार्ग काढावा अशी शेतकऱ्यांमधून अपेक्षा व्यक्त होत आहे .

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: