पंढरपूर तालुका पोलीसांनी केवळ 40 तासात लावला अल्पवयीन पीडित बालिकेचा शोध

पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडून संवेदनशील गुन्ह्याची तितक्याच तत्परतेने उकल,केवळ 40 तासात लावला अल्पवयीन पीडित बालिकेचा शोध…Pandharpur taluka police solved a sensitive crime with equal promptness, searching for a minor victim girl in just 40 hours
पंढरपूर,दिः 21/08/2021- दि.17/08/2021 रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे समर्थ राजू कांबळे रा.आढीव,ता.पंढरपूर याने लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने पळवून नेले असल्याबाबत गुन्हा नोंद झाला होता.सदर  गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नितीन चवरे यांच्याकडे देण्यात आला, त्यानंतर पोलीस हवालदार नितीन चवरे व पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली व गुन्हयातील आरोपी समर्थ राजू कांबळे हा जत,जि.सांगली येथे असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.त्यामुळे पोलीस  हवालदार नितीन चवरे व पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी तात्काळ जत,जि. सांगली येथे जाऊन खात्री केली असता आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीस घेऊन कराडकडे पोबारा केल्याचे समजले. पोलीस हवालदार नितीन चवरे व पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीच्या आधारे कराड,जि.सातारा येथे जाऊन केवळ 40 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या व पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली. सदर मुलीस कायदेशीररित्या तिच्या आईच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आले आहे. सदरच्या गुन्ह्याची गंभीरता पाहून व तपासाअंती गुन्ह्यामध्ये कलम वाढ करण्यात आली आहे. 

   सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम,अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे व पंढरपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली व पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुका पोलीस  ठाण्याचे पोलिस हवालदार नितीन चवरे,पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अन्वर आत्तार यांनी शितफीने पार पाडली. गुन्हयाचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे  सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: