काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन पक्ष सज्ज- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


श्रीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30/08/2025 – जम्मू काश्मीर मधील गावागावात सर्व जातीधर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवा.काश्मीरमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.काश्मीर च्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवून रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडावे.काश्मीर मध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. श्रीनगरमधील नवगाव येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ना.रामदास आठवले यांनी काश्मीर मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याचे आवाहन केले.यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या संध्या गुप्ता,मंझूर अहमद,मुदस्सर अहमद लोण आदींसह अनेक मान्यवर आणि रिपब्लिकन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीरची प्रगती होत आहे.अनेक उद्योग जम्मू काश्मीर मध्ये येत असून येथील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे.केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि भारत सरकार च्या विविध योजनांचा लाभ जम्मू काश्मीरमधील जनतेला मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. भारतातील सर्व यात्रेकरूंनी जम्मू काश्मीर चे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जम्मू काश्मीर निर्भयपणे यावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.


येत्या नोव्हेंबर मध्ये काश्मीरात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होत आहे.त्या सर्व निवडणुका रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार आहे.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन श्रीनगर येथे करण्यात आले होते त्यावेळी ना.रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले.

