सहकार शिरोमणी बचाव समितीच्या शिष्टमंडळाने कारखान्यावर जावून घेतली घेतली भेट

सहकार शिरोमणी बचाव समितीच्या शिष्टमंडळाने कारखान्यावर जावून घेतली घेतली भेट

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी भाडे तत्वावर चालविण्यास देण्याबाबत ?

धोंडेवाडी/ज्ञानप्रवाह न्यूज- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.भाळवणी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी या कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी दिलेला आहे अशी चर्चा गेल्या महिन्या भरापासून सभासद,कामगार,शेतकरी,संचालक मंडळ व सर्व माध्यमांमधून आहे.परंतु याबद्दलची प्रत्यक्ष काय कारवाई झाली किंवा नाही हा संभ्रम सर्व सभासदांमध्ये आहे तो दूर करणं गरजेचं आहे यासाठी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.भाळवणी बचाव समितीच्या शिष्टमंडळाने कारखान्यावर जावून घेतली कार्यकारी संचालक व संचालक मंडळाची भेट घेतली.

कारखाना भाडेतत्वावर देवू नये अशी विनंती केली व सद्यस्थितीची माहिती मागितली. सहकार शिरोमणी कारखाना हा खरोखरच भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात काही तोंडी बोलणे किंवा कागदोपत्री प्रक्रिया राबवली गेली आहे काय ? या गोष्टीचा खुलासा कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी करावा ? अशी मागणी केली असता कार्यकारी संचालक श्री.घोगरे यांनी याबाबत तोंडी बोलणे सुरू असल्याचे कबूल केले.

सभासदांनी कारखाना चालवण्यासाठी त्यांना जबाबदारी दिलेली आहे परंतु त्या सभासदांना अंधारात ठेवून कारखाना कुठल्यातरी खाजगी उद्योजकाच्या घशात घालण्याचं कट कारस्थान सभासदांच्या अप्रत्यक्षपणे सुरू असेल तर त्याबाबतची माहिती सभासदांना देणं गरजेचं आहे.
मागील वर्षीचं ऊस बिल थकीत आहे, कामगारांचे पगार थकित आहेत, कामगारांच्या फंडाच्या रकमा थकीत आहेत,तोडणी वाहतूकदारांची बिल थकीत आहेत. मग १४६ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी यांना दिले. १.५ लाख टनाचे मागील वर्षी गाळप झालं त्या गाळपातून जी साखर व उपपदार्थ तयार झाले, बग्यास, मोलेसिस तयार झाले या सगळ्याचा जर हिशोब केला तर हे सर्व पैसे जातायत तरी कुठे ? ज्या वेळेस तुम्ही शासनाचे थकहमीचे कर्ज घेतलं ते कर्ज हे या लोकांची देणी भागवण्यासाठी म्हणून घेतले होते पैसे आले आणि पैसे संपलेही मात्र या लोकांची देणी ही आहेत तशीच आहेत मग नेमके ते पैसे गेले कुठे ? याचादेखील खुलासा त्यांनी करावा.

कर्ज मागणी ज्या कामासाठी केली होती त्याच कामासाठी वापरणे बंधनकारक आहे.पैसे तर संपलेत मग ते पैसे त्यांनी कुठे खर्च केलेत याबाबत स्पष्टपणे उलगडा होणे आवश्यक आहे.सभासद हा या संस्थेचा मालक आहे.आपल्याला कारखाना चालवण्यासाठी विश्वस्त म्हणून जबाबदारी दिलेली आहे.याचा अर्थ कारखाना विकण्यासाठी किंवा कारखाना दुसऱ्याला चालवण्यासाठी म्हणून आपली नेमणूक झालेली नाही.याबाबत निश्चित माहिती कळायला सोय नाही.पण गेल्या महिन्याभरापासून जोरदार चर्चा आहे तर हा संभ्रम दूर व्हावा.त्याबद्दल खुलासा करण्याची संपूर्ण जबाबदारी ही चेअरमन म्हणून कल्याण काळे यांची आहे. त्यावर संचालक सुरेश देठे यांनी याबाबत मिटिंगमध्ये कोणताही ठराव अद्याप झाला नसल्याचे सांगितले व चेअरमन यांचेशी चर्चा करून दोन दिवसात संचालक मिटींग घेऊन याबाबत खुलासा करू असे सांगितले.

यावेळी माजी संचालक दिपक पवार,नामदेव ताड,ज्ञानेश्वर खरडकर,नंदकुमार बागल, दीपक गवळी,विठ्ठल संचालक धनंजय काळे, प्रकाश देठे, बाबा काळे,धोंडीराम घोलप, विलास देठे, रामचंद्र ढोबळे, बंडू हजारे, रावसाहेब निकम,हनुमंत सोनवले सर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top